पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाणी सोडणार
पुण्यात पुन्हा पूर : मुळशीतून ५२०० क्युसेक, उजनीतून ६० हजार क्युसेक विसर्ग सुरु
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
खडकवासला धरणातून दुपारी २ वाजता ३५ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. हा विसर्ग पुढे ४५ हजार क्यूसेक पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरात महापूर येण्याची शक्यता आहे.
धरण परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरणातून अधिक पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे नदीकाठच्या सोसायट्या व इतर भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.
मुळशी धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी पवना नदीत येत असल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
त्यामुळे संगम पुलाजवळ पाण्याचा फुगवटा तयार होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या पाटील इस्टेट परिसरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी अखेरीस भीमा नदीमार्गे उजनी धरणात येऊन मिळत असल्याने उजनी धरण १०० टक्के भरले आहे.
तेथून भीमा नदीत ६० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. तसेच वीर धरणातून २४ हजार २२० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
खडकवासला धरणातून होणारा विसर्ग
सकाळी ६ वाजता : ५,७८३ क्युसेक
सकाळी ९ वाजता : ७,९२५ क्युसेक
सकाळी १०:३० वाजता : १६,२४७ क्युसेक
दुपारी १२ वाजता : २२,८८० क्युसेक
इतर धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग
पानशेत : १,७१४ क्युसेक
निरा देवधर : ४,५३३ क्युसेक
वीर धरण : २४,२२० क्युसेक
घोड धरण : १५,००० क्युसेक
चासकमान : ७,२५० क्युसेक
भामा आसखेड : ७,२२५ क्युसेक
मुळशी धरण : ५,२०० क्युसेक
उजनी धरण : ६०,००० क्युसेक
