आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

परिमंडळ दोनमधील ७०१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 14, 2026
Spread the love

पुणे : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७०१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

अशा एकूण ७०१ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास तसेच वास्तव्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्यास, मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास आणि सार्वजनिकरित्या वावरण्यास मनाई केली आहे.

सार्वजनिक शांततेस बाधा येईल, असे कृत्य करण्यासही मनाई केली आहे. या सर्व गुन्हेगारांना त्यांच्या पोलीस हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी हे आदेश दिले आहेत.