आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

१३२ म्यूल खातेधारकांविरुद्ध गुन्हे दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 1, 2026
Spread the love

पुणे : सायबर गुन्हेगारांना कमिशनच्या बदल्यात बँक खाते वापरण्यास देणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अशा १३२ म्यूल खातेधारकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून १५२ जणांना अटक केली आहे. सायबर गुन्हेगारांचे आर्थिक जाळे उध्वस्त करून ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशभरात ‘ऑपरेशन म्यूल हंट’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे.