आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बुलेट चालकांविरुद्ध काळेपडळ पोलिसांचा बडगा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 3, 2026
Spread the love

पुणे : मध्यरात्री मॉडिफाईड सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढत फिरून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. पोलिसांनी या दुचाकीस्वारांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून ११ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तसेच मॉडिफाईड सायलेन्सर बसविणाऱ्या दोन गॅरेजवर कारवाई करत ती सील करण्यात आली आहेत. ही कारवाई कडनगर चौक, न्याती चौक, रहेजा व्हिस्टा चौक, उंड्री आणि महंमदवाडी परिसरात ३१ जुलै रोजी रात्री ११ ते १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात आली.

सुमित वसंत सगट (वय २०, रा. इंदिरानगर, महंमदवाडी), शिवम दीपक जाधव (वय २१, रा. इंदिरानगर, महंमदवाडी), आर्यन जगन्नाथ गायकवाड (वय १९, रा. इंद्रायणीनगर, महंमदवाडी), सार्थक प्रदीप अल्हाट (वय १८, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), राज ऊर्फ यश सागर रणदिवे (वय १९, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), तुषार नितीन गायकवाड (वय २१, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), धीरज लक्ष्मण गॅजगे (वय २३, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), प्रेम सिद्धार्थ गायकवाड (वय १८, रा. गोपाळपट्टी, मांजरी), वरद सनी तोडकर (वय १८, रा. काळेपडळ, हडपसर), दिनेश रितेश लांबोटे (वय १९, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, महंमदवाडी), राजेंद्र सतीश वाघमोडे (वय १८, रा. सुलाई कॉम्प्लेक्स मागे, महंमदवाडी) आणि रवि किसन लोखंडे (वय २०, रा. शेल पंपामागे, महंमदवाडी) यांच्या एकूण ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

तसेच गॅरेज व्यावसायिक युसूफ फारुख शेख (वय २४, रा. गुलामअली नगर, सय्यदनगर, हडपसर), रोहन बबलू महापुरे (वय २४, रा. पोस्टमन कॉलनी, महंमदवाडी) आणि निखील फुलाजी सरडे (वय २६, रा. काळेपडळ, हडपसर) यांच्या गॅरेजमध्ये मॉडिफाईड सायलेन्सर बसविण्यात येत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली.

सहायक पोलीस फौजदार राजस शेख, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांनी बुलेट चालक तसेच इतर दुचाकीस्वारांविरुद्ध ही कारवाई केली.

या मोहिमेत पोलिसांनी बुलेटसह ११ दुचाकी जप्त केल्या. मोटार वाहन कायदा, सार्वजनिक शांततेचा भंग तसेच केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील कलम १२० अन्वये एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, सहायक पोलीस फौजदार राजस शेख, पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, शाहिद शेख, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर आणि लक्ष्मण काळे यांनी केली.