आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डोक्यात दगड घालून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 13, 2026
Spread the love

पुणे : सकाळी सकाळी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दारुड्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून या दारुड्याला अटक केली आहे.

प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू शिवलिंगप्पा इकळकी (वय ३५, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत राजू यांची आई लक्ष्मीबाई शिवलिंगप्पा इकळकी (वय ५७, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुलटेकडी येथील डायस प्लॉट येथे १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम काळे याने राजू इकळकी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. राजू यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला.

याचा राग मनात धरून प्रेम काळे याने राजू यांना शिवीगाळ करून मारहाण केली. चेहऱ्यावर व डोक्यात दगडाने वारंवार वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

गंभीर जखमी अवस्थेत राजू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वारगेट पोलिसांनी प्रेम काळे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील शेळके तपास करीत आहेत.