आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आनंद दरबार येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 17, 2026
Spread the love

पुणे : दत्तनगर-कात्रज येथील आनंद दरबार येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिक, जवान तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केले.

कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या फियोना अल्पेश भन्साळी आणि विहंग शेडगे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी यंत्रनिर्माण पतसंस्था, कात्रजचे अध्यक्ष विकास फाटे, उद्योजक अनिल भन्साळी, महिला दहीहंडी उत्सवाचे संस्थापक सोनु वाळुंज तसेच आंतरराष्ट्रीय पखवाज वादक दीपक दसवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीम तसेच राष्ट्रध्वज गीताचे उत्साहपूर्ण सादरीकरण करून कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह निर्माण केला.

आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आनंद दरबारचे दिलीप संचेती, प्रकाश भटेवरा, सुबास पिरगल, संतोष भंडारी, संतोष दूगड, प्रमोद राका, जवाहर धोका, नूतन कुलकर्णी, सौरभ धोका तसेच सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.