शंकरराव पाटील महाविद्यालयात संत तुलसीदास जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी साहित्याचे महान संतकवी गोस्वामी तुलसीदास यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. तानाजी बोराडे यांच्या हस्ते संत तुलसीदास यांच्या ‘रामचरितमानस’ या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यानंतर हिंदी विभागाच्या विद्यार्थिनी आकांक्षा माणिक थोरात यांनी संपादित केलेल्या ‘नवज्योती’ या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ. संतोष भांडवलकर, डॉ. राजश्री तावरे आणि डॉ. ज्योती डुंगरवाल तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे तसेच विद्या विकास मंडळ, पाथरूडचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हिंदी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
