आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढव्यात अंमली पदार्थ टास्क फोर्सची मोठी कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 20, 2026
Spread the love

पुणे : कोंढव्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने गुरुवारी पहाटे मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडे अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आलेल्या ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ दुचाकी, तीनचाकी गाड्या, ३५ मोबाईल, तसेच २६ हजार ९६० रुपये रोख आणि ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

अजु अहमद शेख (रा. कोंढवा) आणि गणेश सिद्धू पाटोळे (रा. बुद्धविहार सोसायटी, कोंढवा) अशी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

गणेश पाटोळे हा अजु शेख याच्याकडे कामाला आहे. त्यांच्यावर यापूर्वी एनडीपीएसचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यात गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीतील दर्ग्याजवळ सापळा रचला.

तेथे अज्जू भाई आणि गणेश पाटोळे आले होते. त्यांच्याकडे ३ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गांजा विकत घेण्यासाठी आलेल्या ४३ जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्राच्या पुणे पथकाचे प्रमुख विशेष पोलीस उपमहानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त अनुज तारे, पोलीस उपअधीक्षक नंदिनी वग्यानी, तावसकर, पोलीस उपनिरीक्षक आशिष सरवदे, सहायक फौजदार तुपे, पोलीस हवालदार कळसकर, पोलीस अंमलदार ढेभे, साबळे आणि होळकर यांनी केली आहे.