आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टतर्फे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 21, 2026
Spread the love

पुणे : शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टच्या वतीने जयराज भवन, शुक्रवार पेठ येथे देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य तसेच मार्केट यार्ड येथील प्रसिद्ध चहा व्यापारी बिपीन माणेकलाल मेहता आणि आशाबेन बिपीन शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे विश्वस्त व मानद सचिव सुनील रमणलाल शहा यांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले.

त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप डाह्याभाई मेहता, पुष्पाबेन भरतभाई शहा आणि सुनिता सुनील शहा यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.

गेल्या तीन वर्षांपासून जयराज भवनची उत्कृष्ट देखभाल आणि अविरत सेवा बजावणाऱ्या संस्थेच्या सेवकांचा प्रमुख पाहुणे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य सुनील पन्नालाल शहा, नरेंद्र शांतीलाल शहा तसेच उपस्थित मान्यवर सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावर्षी संस्थेच्या सर्व सेवकांच्या सन्मानार्थ व्यवस्थापक ललित माणेकलाल शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

यावेळी संस्थेचे सदस्य, निमंत्रित मान्यवर तसेच आयडियल पूर्व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर भरतपुष्प स्वागत कक्षामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

स्वरांगण दृष्टिहीन संस्था येथील दृष्टिहीन कलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संस्थेच्या वतीने या कलाकारांना आर्थिक मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप ‘जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठान’ संचलित ‘जिनभक्ती मानव सेवा बाल आश्रम’, कात्रज, पुणे तसेच ‘आयडियल पूर्व प्राथमिक शाळा’ येथील गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे दानदाते, सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमानंतर उपस्थितांनी स्वादिष्ट अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.