आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड, महेश लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 24, 2026
Spread the love

पुणे : सीटीएस लॉजिस्टिक लिमिटेडचे डायरेक्टर तथा युवा उद्योगपती महेश लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 21 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून महेश लुंकड यांना वाढदिवसाची अनोखी आणि संस्मरणीय भेट दिली.

रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. शिबिराला दानशूर उद्योगपती पारसमलजी लुंकड यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत अशा सामाजिक उपक्रमांची आज समाजाला मोठी गरज असल्याचे सांगितले. उपस्थितांनी महेश लुंकड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.