आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 26, 2026
Spread the love

पुणे : वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत शहबाज मेहमूद खान (वय ५२, रा. अशोका आगम बिल्डिंग, संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका चारचाकी वाहनचालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा, तसेच प्राणी संरक्षण अधिनियम कलम ११ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास खान यांच्या घरासमोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्राणी संरक्षण जनजागृतीचे काम करतात. खान यांच्या घरासमोर एका भटक्या श्वानाचा वावर होता. २३ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास भरधाव चारचाकी वाहनाने श्वानाला धडक दिली. त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले.

पोलिसांनी जखमी श्वानाला औंध येथील पशु महाविद्यालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी या बेवारस श्वानाची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. पोलीस हवालदार प्रीतम जगताप तपास करीत आहेत.