आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोबाईल चोरणारे दोघे चोरटे गजाआड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 8, 2026
Spread the love

पुणे : गर्दीत नागरिकांकडील मोबाईल संच चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २७ हजार रुपयांचे १४ मोबाईल जप्त करण्यात आले.

प्रणित नरेंद्र जाधव (वय २०, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), राहुल सुरेश सहाणी (वय २२, रा. थिटे वस्ती, खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांत मुंढवा परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे वाढले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून प्रणित जाधव व राहुल सहाणी यांनी मोबाईल चोरल्याचे निष्पन्न केले होते.

पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन जाधव आणि सहाणी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ मोबाईल संच जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनीक, पोलीस निरीक्षक सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोलीस अंमलदार संभाजी नाईक, हवालदार विनोद साळुंके, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे, रुपेश तोडेकर यांनी केली.