आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मेडिकलच्या विद्यार्थीनीची दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 10, 2026
Spread the love

पुणे : कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम सोसायटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय विद्यार्थीनीने दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आदिमाया शेखर रेड्डी (वय २१, रा. नॅन्सी लेक होम सोसायटी, कात्रज, मूळ रा. तिरुमलंगरी, हैदराबाद) असे या तरुणीचे नाव आहे. आदिमाया रेड्डी ही एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती भावासोबत कात्रज येथील एका फ्लॅटमध्ये राहत होती. परीक्षेचा ताण आल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या भावाने दिली.

अभ्यासाचे ओझे, परीक्षेचा प्रचंड ताण तसेच वाढत्या अपेक्षांचा ताण सहन न झाल्याने आदिमाया हिने ती राहत असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीला रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.