आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २७ गुन्हेगारांना केले तडीपार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 11, 2026
Spread the love

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत २७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यात परिमंडळ ७ मधील २२ गुन्हेगारांचा समावेश आहे.

लोहगाव पोलीस ठाणे :
गुलाम ऊर्फ गुड्डू नवरुलहक मुस्ताफा खान (वय ५०, रा. बुद्ध विहार, कलवड वस्ती, लोहगाव), शुभम सुखदेव सोनवणे (वय ३८, रा. बंगला नं. १०१, संजय पार्क, एअर फोर्स रोड, लोहगाव), दीपक तुकाराम गायकवाड (वय ४६ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०१, साई अंगण सोसायटी, ऑर्किड हॉस्पिटलजवळ, लोहगाव), अतुल गौतम ढोकरे (वय ३५ वर्षे, रा. लेन नं. ६, गणराज चौक, कलवड वस्ती, लोहगाव), आरती संजय साठे ऊर्फ जमदाडे (वय ४३ वर्षे, रा. पार्कश्री फ्लॅट नं. ६०३, पोरवाल रोड, धानोरी, लोहगाव).

विमानतळ पोलीस ठाणे :
अनिल साहेबराव वीर (वय ४७ वर्षे, रा. खेडे विद्यालयाजवळ, इंदिरानगर, धानोरी), मुकेश बजरंग बुरुंगे (वय ३६ वर्षे, रा. लेन नं. १०, यमुना नगर, विमाननगर), सागर गौतम अवधूत (वय २२ वर्षे, रा. स. मा. आंबेडकर शाळेच्या पाठीमागे, रामवाडी).

वाघोली पोलीस ठाणे :
रिना पवन राजपूत (वय ३५ वर्षे, रा. बोरकरवस्ती, भावडी रोड, वाघोली, ता. हवेली), दत्तात्रय रंगनाथ गायकवाड (वय २९ वर्षे, रा. लेन नं. ११, दुबे नगर, केसनंद रोड, वाघोली), महेश देवराम लोंढे (वय २६ वर्षे, रा. दुबे नगर, लेन नं. १३, वाघोली).

लोणीकंद पोलीस ठाणे :
सागर राजू ऊर्फ राजेंद्र भालसिंग (वय ३२ वर्षे, रा. भालसिंग वस्ती, कोलवडी, ता. हवेली), सचिन किसन शिंदे (वय ३९ वर्षे, रा. गणेश मंदिराजवळ, लोणीकंद, ता. हवेली), हर्षद कुमार शिंदे (वय २४ वर्षे, रा. शिंदे वस्ती, लोणीकंद, ता. हवेली), रोशन कुमार साहू (वय २४ वर्षे, रा. सध्या बोरकरवस्ती, विटकर यांच्या खोलीत, भाड्याने, भावडी, ता. हवेली), अजिंक्य दादासाहेब मस्कुटे (वय २७ वर्षे, रा. खामगाव बु., ता. दौंड), संतोष गोविंद जाधव (वय २८ वर्षे, रा. लोणीकंद, ता. हवेली), प्रकाश बाबुराव शिवभक्ते (वय ३४ वर्षे, रा. खडकवाडी, लोणीकंद).

चंदननगर पोलीस ठाणे :
सुमित सुशील बोरगे (वय ३० वर्षे, रा. स. नं. ५६/२, पंचशील नगर, माळवाडी, वडगावशेरी), गणेश जालिंदर गलांडे (वय ३७ वर्षे, रा. ओमकार सोसायटी, आनंद पार्क, सर्वे नं. ४९, वडगावशेरी), अतिश उमेश डिगरे (वय २३ वर्षे, रा. लेन नं. ९, कमल पार्क सोसायटी, धानोरी), सुमित ऊर्फ बंटी रणजित गायकवाड (वय २५ वर्षे, रा. स. नं. ३०/२, रामवाडी).

या आरोपींवर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अग्निशस्त्राचा वापर करून जिवे ठार मारणे, गुन्ह्याचा कट रचणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, व्हिडीओ प्रसारित करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत करण्याची धमकी देऊन बलाद्ग्रहण करणे, जबरी चोरी करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत पसरवून तोडफोड करणे, गंभीर दुखापत करणे, जुगार चालविणे/खेळणे, मानवी अपव्यापार करणे, अल्पवयीन बालकाचा विनयभंग करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे, अवैध गावठी हातभट्टी दारूची निर्मिती/विक्री करणे इत्यादी प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी त्यांना तडीपार केले आहे.

शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करणारा गुन्हेगार मुसा अबू शेख (वय २५, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर) तसेच अवैध दारूचा व्यवसाय करणारा अशोक महादेव राऊत (वय २८, रा. सुरक्षानगर, हिंगणे मळा, हडपसर) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत. शेख याच्याविरुद्ध मारामारीचे चार गुन्हे दाखल आहेत. राऊत याच्याविरुद्ध गावठी दारू विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी दोघांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंक्य संतोष काळे (वय २४, रा. गणेशनगर, आंबेगाव पठार), सरफरोज समीर शेख ऊर्फ डर (वय २४, रा. एसआरए कॉलनी, लेक टाऊन सोसायटीजवळ, कात्रज) आणि महेश ऊर्फ बंटी विनायक चव्हाण (वय २२, रा. खोपडेनगर, कात्रज) या तिघा सराईत गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.