आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधांना गती

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 12, 2026
Spread the love

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रस्ते व अन्य पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. बहुतांश रस्ते विकासकामे सुरू झाली असून, पूर्ण झालेल्या तसेच प्रगतिपथावर असलेल्या कामांमुळे चाकण एमआयडीसीतील वाहतूक व्यवस्थेत आगामी काळात मोठा बदल अपेक्षित आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली.

या बैठकीत रस्ते विकासासह वाहतूक व्यवस्थापन, वाहनतळ, पाणी निचरा, वीजपुरवठा, रस्तादुभाजक आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, आमदार शंकर मांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महावितरण, जीवन प्राधिकरण यांचे अधिकारी, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.