आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तीन पोलीस अंमलदार निलंबित

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 12, 2026
Spread the love

पुणे : रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित राहणे तिघा पोलिसांना चांगलेच भोवले आहे. अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी तिघांना निलंबित केले आहे.

पोलीस अंमलदार शुभम विजय सुर्वे (फरासखाना पोलीस ठाणे), योगेश भागचंद एकशिंगे आणि अभिजित अनिल शिंदे (दोघे वाहतूक शाखा, पुणे शहर) अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

पीटा कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाचा २ जुलै २०२६ रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने पार्टी आयोजित करण्यात आली होती.

या पार्टीत पोलीस अंमलदार शुभम सुर्वे, योगेश एकशिंगे आणि अभिजित शिंदे हे तिघे सहभागी झाले होते. या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची चौकशी करण्यात आली.

पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी त्याबाबतचा अहवाल अपर पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. यावरून या पोलीस अंमलदारांचे वर्तन हे बेशिस्तपणाचे व बेजबाबदारपणाचे असून, शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन करणारे असल्याने अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी तिघा पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे.