आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दिवे घाट आज दुपारी बंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 15, 2026
Spread the love

पुणे : आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या दिवे घाटातील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी घाट परिसरात ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी आज, मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत हडपसर ते दिवे घाट येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.