आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मालाची लोडिंग, अनलोडिंगसाठी नवे वेळापत्रक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 15, 2026
Spread the love

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील दुकानांमध्ये मालाची ने-आण (लोडिंग/अनलोडिंग) करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पहाटे २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत मालाची ने-आण करावी. हा आदेश भोरी आळी, गणेश पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड तसेच मध्यवर्ती भागातील दुकानदारांना लागू आहे. दुकानदारांनी दिलेल्या वेळेचे पालन करून गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.