आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अनैतिक व्यापार करणाऱ्या दोघांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 18, 2026
Spread the love

पुणे : हॉटेलमध्ये दोघे जण फोनवरून बुकिंग घेऊन तरुणींकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार येरवडा पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून दोन महिलांची सुटका केली असून, दोघांना अटक केली.

राज राजेशाम सविता (वय २८, रा. खराडी) आणि सुनील शिवाजी शिंदे (वय ३७, रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

येरवडा पोलीस दलातील पोलीस हवालदार रामेश्वर नवले यांना माहिती मिळाली की, एका हॉटेलवर दोघे जण ग्राहकांकडून फोनवरून बुकिंग घेतात. तसेच तरुणींना वेगवेगळ्या हॉटेलवर पाठवून त्यांच्याकडून अनैतिक व्यवसाय करून घेत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या साहाय्याने त्यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर बनावट ग्राहकाला हॉटेलवर पाठवण्यात आले. तेथे पोलिसांनी कारवाई करून दोन तरुणींची सुटका केली. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी अप्पर खराडी रोड परिसरातून दोघांना ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलीमुला, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते, पोलीस निरीक्षक शारदा कोकाटे, केशव दिंडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार रामेश्वर नवले, कोकणे, तसेच पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, सागर दळवी, लक्ष्मण ठोकळ, नितीन चांदणे, नागेश कुंजटवाड, प्रशांत कांबळे, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, संदीप धादवड आणि ज्योती नाईक यांनी केली आहे.