आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गणेशोत्सवात ४२ लाखांची रोकड सापडली

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 21, 2026
Spread the love

पुणे : गणेशोत्सवात कसबा पेठेतील जिजामाता चौकात एकाकडे ४२ लाख रुपयांची रोकड सापडली. बॅगेत ठेवलेली ही रक्कम फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे सोपविले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौकात शुक्रवारी (१८ सप्टेंबर) एकाकडे मोठी रोकड असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली. बॅग रोख रकमेने भरलेली होती. पोलिसांनी तिची मोजदाद केल्यावर ती एकूण ४२ लाख रुपये असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी या घटनेची नोंद (स्टेशन डायरी) केली. ऐन गणेशोत्सवात इतकी मोठी रक्कम घेऊन तो कोठे चालला होता, तसेच ही रक्कम कशाची आहे, याबाबतची कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. याची माहिती प्राप्तिकर विभागाला पोलिसांनी कळविली आहे. त्यांच्याकडून पुढील तपास केला जाणार आहे.