आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे महानगर पत्रकार संघाकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची महाआरती

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 24, 2026
Spread the love

पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे महानगर पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सकाळी ८ वाजता भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची महाआरती पत्रकारांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या महाआरतीस पुणे महानगर पत्रकार संघाचे पदाधिकारी व शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी गणरायाची आरती करून सामाजिक सलोखा, पत्रकारितेची मूल्ये आणि लोकशाही बळकट होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच पत्रकार परिवाराकडून गणपतीस अभिषेक करण्यात आला.

ट्रस्टच्या वतीने पुणे महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद गव्हाणे यांचा सन्मान करून पत्रकारांचे स्वागत करण्यात आले. आरतीसाठी पत्रकार गुणवंत जाधवर, अशोक काकडे, गौरव कदम, बाबा तारे, अनिल चौधरी, विक्रम मोरे, प्रयागा होगे, उत्कर्ष खवले, रामदास दातार, संदीप वाडेकर व आदी पत्रकार उपस्थित होते.

सर्व उपस्थित पत्रकारांचा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत फोटो घेण्यात आला. महाआरतीचा बहुमान दिल्याबद्दल पुणे महानगर पत्रकार संघाच्या वतीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

पत्रकारांच्या महाआरतीसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप आडकर तसेच अंश पिल्ले व ट्रस्टच्या कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.