आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

टाइल्स व सॅनिटरीवेअर डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी घनश्याम गोहिल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 13, 2026
Spread the love

पुणे : टाइल्स व सॅनिटरीवेअर डीलर्स असोसिएशन, पुणेची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ४ ऑक्टोबर रोजी कोंढवा बुद्रुक येथील श्री पूना गुजराती बंधु समाजाच्या जयराज कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये उत्साहात पार पडली. या सभेला १०० हून अधिक सदस्य उपस्थित होते.

सभेत असोसिएशनच्या मागील कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी २०२६-२८ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी घनश्याम गोहिल, सचिवपदी रविंद्र शर्मा, कोषाध्यक्षपदी प्रशांत टाटिया यांची निवड करण्यात आली. संजय गांधी यांची माजी अध्यक्ष (इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

असोसिएशनच्या सल्लागारपदी अशोक ओसवाल आणि अश्विन गांधी यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून राजेश पटेल, जिग्नेश वडसोला, कमलेश ठक्कर, मिथुन ओसवाल, हितेश परमार, गिरीश पिपलिया, दर्पण जेन, निलेश भंडारी, पंकज वनालिया, रोहित ओसवाल आणि प्रशांत पटेल यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीने सर्व सदस्यांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे, परस्परांमधील एकोपा अधिक दृढ करणे तसेच असोसिएशनला अधिक सक्रिय व संघटित करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

सभेनंतर सर्व सदस्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सदस्य आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले. या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जॉय वॉटर यांचे प्रायोजकत्व लाभले.