आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 13, 2026
Spread the love

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारपासून (दि. १५ ऑक्टोबर २०२६) पुणे शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी माहिती दिली आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी राज्य शासनाने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे पुणेकरांना आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीत नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.