आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खंडणी उकळणारा पोलीस अंमलदार निलंबित

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 13, 2026
Spread the love

पुणे : फुरसुंगी परिसरातील गुटखा विक्रेत्याला कारवाईची भीती दाखवून ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी १ लाख ६५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

पोलीस अंमलदार रामकिशन धोंडिबा हंबर्डे असे निलंबित करण्यात आलेल्याचे नाव आहे. रामकिशन हंबर्डे आणि सतीश मोरे यांनी संगनमत करून गुटखा विक्रेत्याला कारवाई करण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी केली.

त्यापैकी १ लाख ६५ हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, अवैध गुटख्यावरील कारवाईची भीती घालून एक किलो काजू-बदामही नेल्याबाबतची तक्रार सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्यानंतर निदर्शनास आली आहे.

फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याबाबत अहवाल पाठविला. हे लक्षात घेऊन पोलीस दलातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या वर्तनाबाबत जनमानसात प्रश्न निर्माण होण्याची, तसेच पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी त्याला निलंबित केले आहे.