आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची १४ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 17, 2026
Spread the love

पुणे : सिनिअर सिटीझन कार्ड देण्याचे आमिष दाखवून एपीके फाईल पाठवत सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची १४ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

याबाबत फातिमा हिल्स परिसरात राहणाऱ्या एका ७२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी १३ ऑक्टोबर रोजी महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला.

राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करून बँकेकडून सिनिअर सिटीझन कार्ड देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवली.

ही फाईल उघडल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलचा तांत्रिक ताबा घेतला आणि बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून १४ लाख २७ हजार रुपये काढून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक तांबोळी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.