आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनसंस्कृती वाढीस लागावी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 21, 2026
Spread the love

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक जत्रा आणि पुणे पुस्तक महोत्सव व मराठी साहित्य संमेलनाचे ७ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत न्यू इंडिया स्कूल, टिळक रस्ता, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पुणे पुस्तक जत्रेत सहभाग नोंदविण्यात आला. संस्थेच्या स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येक पुस्तकप्रेमीला एक पुस्तक मोफत भेट देण्यात आले.  प्रदर्शनाच्या चार दिवसांत विद्यार्थ्यांना हजारो पुस्तकांचे वाटप फाऊंडेशनतर्फे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या मेंदूच्या प्रगतीसाठी चांगल्या व्यक्तिमत्वांची पुस्तके वाचायला हवीत, त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी, असे मत ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाचा प्रसार करणे आणि पुस्तकांशी नाते अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

अशाप्रकारच्या सामाजिक उपक्रमात सूर्यदत्त नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थी आणि समाज कल्याणाच्या दृष्टीने डॉक्टर चोरडीया यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रम सातत्याने राबविले जातात.

त्याचाच एक भाग म्हणून हा पुस्तक वाटपाचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला,
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या स्टॉलवर संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्याबरोबरच वाचन आणि पुस्तकांशी संबंधित उपक्रमही राबविण्यात आली.

‘प्रत्येक पुस्तकप्रेमीने एक पुस्तक घरी घेऊन जावे’ हा संदेश देत स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येकाला पुस्तक भेट देण्यात आले. पुस्तके ही केवळ वाचनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, विचारांची समृद्धी आणि ज्ञानाचा विस्तार करण्याचे प्रभावी माध्यम आहेत, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सूर्यदत्तकडून सांगण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे विशेष गौरव करण्यात आला.

या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, पदक आणि त्यांच्या आवडीचे पुस्तक भेट देण्यात आलेविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाची दखल घेऊन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे.