आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मद्यधुंद प्रवाशाकडून कॅबचालकाला मारहाण

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 20, 2026
Spread the love

पुणे : सांगितलेल्या लोकेशनवर न आल्याच्या रागातून मद्यधुंद प्रवाशाने कॅबचालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. आरोपींनी मोटार पेटवून देण्याची धमकीही दिली.

याबाबत विनायक लाडप्पा क्षीरसागर (वय २८, रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी रोहित संदीप गोयत (वय २३) आणि सागर राजेश यादव (वय २९, दोघे रा. कुमार पार्क, मगरपट्टा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेतीन वाजता अमानोरा पार्क येथील मार्वेल कमर्शियल परिसरात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रॅपिडो कॅब अॅपद्वारे कॅब बुक केली होती. क्षीरसागर हे कॅबचालक त्यांना घेण्यासाठी गेले असता, दोघेही दारूच्या नशेत होते.

सांगितलेल्या लोकेशनवर का आला नाही, या रागातून त्यांनी फिर्यादी यांच्या पोटात व अवघड जागी मारहाण करून त्यांना दुखापत केली.

तसेच, त्यांची गाडी पेटवून देण्याची धमकी दिली. रोहित गोयत याचा मित्र सागर याने फिर्यादी यांना पुन्हा त्या ठिकाणी बोलावून मोठमोठ्याने आरडाओरडा करत मारहाण केली. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.