शुभम एंटरप्रायझेसच्या शंकरशेठ रोड, पुणे येथील नव्या दालनाचे उद्घाटन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : टाइल्स, सॅनिटरीवेअर आणि बाथवेअर क्षेत्रातील शुभम एंटरप्रायझेस या प्रतिष्ठानच्या नव्या दालनाचे रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील शंकरशेठ रोड येथे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा प्रतिष्ठानच्या व्यावसायिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
या प्रतिष्ठानचे संचालक शेषमल चोरडिया, अनिल चोरडिया, वनिता चोरडिया, शुभम चोरडिया आणि साक्षी चोरडिया हे आहेत.
या उद्घाटन समारंभाला माणिक दुगड, राजेंद्र बांठिया, रायकुमार नहार, ईश्वर नहार, आशिष दुगड, पोपटलाल ओसवाल आणि राजकुमार चोरडिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
शुभम एंटरप्रायझेसच्या माध्यमातून घरगुती तसेच व्यावसायिक जागांसाठी दर्जेदार टाइल्स, सॅनिटरीवेअर आणि बाथवेअरची विविध उत्पादने ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांच्या विविध आवडी, गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
शुभम एंटरप्रायझेसने आपल्या नव्या दिमाखदार अशा प्रवासाला सुरुवात केली आहे.तसेच दर्जेदार सेवा देण्यावर प्रतिष्ठानचा भर राहणार आहे.
