आवृत्ती पुणे

विधिसंघर्षित दुचाकीचोर दुचाकीसह ताब्यात

समर्थ पोलिसांची कामगिरी : मौजमजेसाठी केली वाहनचोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या विधिसंघर्षित बालकास दुचाकीसह ताब्यात घेण्यात समर्थ पोलिसांना यश मिळाले असून, सदरची गाडी दाखल गुन्ह्यात जप्त केली आहे. पुणे शहरामध्ये सध्या गणेशोत्सव साजरा होत असताना, नागरिक शहरामध्ये खरेदीसाठी दुचाकीवरून येतात व रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्क करून आपली खरेदीची कामे … Read more

शेतकऱ्यांना २३ कोटींचा गंडा घालणारा जेरबंद

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : पुणे, सोलापूर-रायगडमधील सुमारे ५०० शेतकऱ्यांची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : औषधी वनस्पती शेतात लागवड केल्यानंतर त्याचे उत्पादन विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून पुणे, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील पाचशेंपेक्षा अधिक शेतकऱ्यांना तब्बल 23 कोटी 45 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेतील आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली … Read more

दोघे दुचाकीचोर शिताफीने जेरबंद

फरासखाना पोलिसांची कामगिरी : दोन गुन्ह्यांतील दोन दुचाकी ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज बुधवार पेठेमध्ये रात्री मैत्रिणीला भेटण्यासाठी येऊन जाताना वाहनचोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी चोरीच्या गाडीसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने नागरिकांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे फरासखाना पोलीस … Read more

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार

स्थानिकांनी चोरट्यास पकडून बेदम चोपले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खडक माळ आळीमद्ये चोरट्याने हवेत गोळीबार केल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक नागरिकांनी या चोरट्याला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, खडकमाळ आळी येथे 45 वर्षांचा चोरटा चोरीच्या उद्देशाने आला … Read more

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

हडपसर-फुरसुंगीतील घटना : हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पती, सासू, सासरा व नणंद यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फुरसुंगी (ता. हवेली) येथे हा प्रकार ३१ ऑगस्ट २०२१ रोजी घडला. आरतीकुमारी सुनीलकुमार यादव (वय २१, रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, रेल्वेगेटजवळ, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या … Read more

भररस्त्यात वाहनचालकांना अडविणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार आल्यास कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता – लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे–सोलापूर महामार्गावर वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या मध्यभागी जाऊन वाहनांवर कारवाई केली आणि वाहनचालकाने तक्रार दिली, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लोणी काळभोर येथे दिला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील लोणी … Read more

कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीला फसवणारा जेरबंद

शिवणे येथील प्रकार : वारजे माळवाडी पोलिसांत फिर्याद दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीला रोख आणि ऑनलाईन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितले. पैसे भरूनदेखील आरोपीने तरुणीला कामावर न ठेवता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार शिवणे येथील लाइमलाइट ट्रेन्डस प्रा. लि. या कंपनीत घडला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी … Read more

जीवाच्या भीतीने पिस्टल बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

युनिट-१ची कारवाई : पिस्टल आणि जीवंत काडतूस केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सराईत गुन्हेगाराला सापळा रचून अटक करुन त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल आणि एक जीवंत काडतूस जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शखा युनिट-१च्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने 11 वर्षापूर्वी खून केला होता. त्यामुळे त्याला भीती वाटत … Read more

36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा पती अटकेत

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार : पत्नीला जीवे मारण्याची दिली होती धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क जीव देण्याची धमकी देऊन 36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर आरोपीने पत्नीला जीव … Read more

बाप रे… पाणीपुरीच्या वादातून पुण्यात पत्नीची आत्महत्या

भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पाणीपुरी न विचारता आणल्याच्या वादातून पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. दोन दिवसांपूर्वी पाणीपुरीवरून वाद झाल्यानंतर तिने विषारी औषध प्राशन केले होते. शनिवारी (दि. २८ ऑगस्ट २०२१) दुपारी दोन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय-23 रा. फ्लॅट नं.202, सिंहगड व्हिला, आंबेगाव … Read more