समर्थ पोलिसांची कामगिरी : मौजमजेसाठी केली वाहनचोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या विधिसंघर्षित बालकास दुचाकीसह ताब्यात घेण्यात समर्थ पोलिसांना यश मिळाले असून, सदरची गाडी दाखल गुन्ह्यात जप्त केली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या गणेशोत्सव साजरा होत असताना, नागरिक शहरामध्ये खरेदीसाठी दुचाकीवरून येतात व रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्क करून आपली खरेदीची कामे करत असतात. समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दि. १३ सप्टेंबर रोजी फिर्यादीची ॲक्टिवा गाडी चोरी झाली होती आणि त्यांच्या तक्रारीवरून समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी करीत होते. सदर गुन्ह्यातील चोरी झालेली ॲक्टिवा गाडीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व बातमीदारामार्फत शोध घेतला असता, सदरची गाडी ही गणेश पेठ येथे रहाणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाने चोरी केली होती. त्यास त्याचे वडिलांसमक्ष ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सदरची गाडी ही मौजमजेसाठी व गाडीवर फिरण्याचा शौक आहे म्हणून चोरी केल्याबाबत सांगितले आहे. सदरची गाडी दाखल गुन्ह्यात जप्त केली आहे.
सदरची कामगिरी ही, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश भालेराव, पोलीस अंमलदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, शुभम देसाई, सुभाष मोरे, नीलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली आहे.
