आवृत्ती पुणे

पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर, दीप पुरोहित आणि रिनल पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल

2 कोटीचं फसवणूक प्रकरण : कार्यालयात बोलावून मारहाण करुन केला पाय फ्रॅक्चर पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क देणेकर्यांनी तगादा लावल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीप विजय पुरोहित (रा. कल्याणीनगर), गौतम पाषाणकर … Read more

खंडणी उकळणारे कथित ‘मानवाधिकार’चे सातजण पोलिसांच्या जाळ्यात

वाकड पोलिसांत गन्हा दाखल : दुकानदारावर रूबाब करण्यासाठी पोलिसांना बोलावले अन् स्वतःच अडकले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून किराणा दुकानदाराला भेसळ करता म्हणून धमकाविले. रुबाब दाखविण्यासाठी त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पण, तो डाव त्यांच्यावरच उलटला. पोलिसांनी खंडणी उकळणार्यावर या कथीत मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या ७ … Read more

व्याजाच्या पैशासाठी मारहाण केल्याने एकाची आत्महत्या

म्हाळुंगे येथील घटना : आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने प्रकरण उघड पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क व्याजाच्या पैशांसाठी मारहाण केल्याने एकाने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. म्हाळुंगे परिसरात ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे मागत होते. त्यांनी तगादा लावला होता. त्रास देऊन … Read more

दुचाकीचोराला अटक करून ९ दुचाकी केल्या जप्त

हडपसर पोलिसांची कारवाई : ग्लायडिंग सेंटरजवळ घेतल्या ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क हडपसर-ग्लायडिंग सेंटरजवळ थांबलेल्या संशयिताला अटक करून त्याने चोरलेल्या नऊ दुचाक्या जप्त केल्या. हडपसर पोलिसांनी सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. यशदिप गोविंद कोंडार (वय 22, रा. शिवशक्ती चौक, गंगानगर, भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. त्रिसंगम सोसायटी, नंदादिपनगर, मृणाली रोड, चक्की … Read more

टेम्पो रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क आंबेगाव बुद्रुक येथे टेम्पोचालक टेम्पो रिव्हर्स घेत असताना पादचाऱ्याला धक्का लागून अपघात झाला. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटनी शुक्रवारी (दि. १०) नवलेब्रिजकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या बायपास मार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे घडली. भरतकुमार प्रसाद (वय २६, रा. धनकवडी) असे … Read more

धायरीमध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : दुचाकीवरील चोरट्यांनी डाव साधला पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क गर्दी आणि निर्जन मनुष्यवस्तीच्या ठिकाणी चोरट्यांनी मोबाईल आणि मंगळसूत्राची चोरी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ज्येष्ठ महिला भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे … Read more

बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून साडेतीन लाखाची चोरी

शिवणे येथील श्री कॅम्प्लेक्समधील प्रकार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शिवणे येथील श्री कॉम्प्लेक्समधील फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी एक लाख १२ हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ४९ हजार ९४ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री १० ते ९ सप्टेंबर सकाळी ११ दरम्यान ही घटना … Read more

महिलेचे ‘न्युड’ फोटो फेसबुकवर ‘व्हायरल’ करुन ‘बदनामी’

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : गाझीयाबादच्या तरुणाने ब्लॅकमेल करून केलं ‘हे’ कृत्य पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोल्हापूर येथील एका महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवुन त्याचे न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन उत्तर प्रदेशातील गाझीयाबादच्या एका तरुणाने महिलेवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर आता ते न्युड फोटो व व्हिडिओ फेसबुकवर टाकून महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर … Read more

आंतरराष्ट्रीय पेंटिंग व्यवहारात व्यावसायिकाला 4.5 कोटींना गंडा

मुंढवा पोलिसांत तक्रार : जेरार्ड मार्टी यांच्याबरोबर केटीएमएस कंपनीचे ७-८ व्यवहार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान पेंटिंगच्या खरेदी व्यवहारात नायजेरियन सायबर चोरट्यांनी ई मेल हॅक करुन पुण्यातील व्यावसायिकाला तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर परिसरातील एका 48 वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलिसांना फिर्याद दिली … Read more

रविंद्र बऱ्हाटेला फरार कालावधीत आश्रय देणाऱ्या वकिलाला जामीन

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क एक वर्षाहून अधिक काळ फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे याला आश्रय दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या वकिलाला मोक्का न्यायालयाने 15 हजार रुपयांचा जामीन दिला आहे. अंतर्गत तपासासाठी त्याच्या ताब्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढत विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी हा आदेश दिला. ॲड. सागर संजय म्हस्के ( वय … Read more