क्षत्रिय मराठा कदम प्रतिष्ठानचे चौथे स्नेहसंमेलन गलांडवाडी ता. दौंड पुणे जिल्ह्यात २२/२३ जानेवारी रोजी होणार

क्षत्रिय मराठा कदम प्रतिष्ठानचे चौथे स्नेहसंमेलन गलांडवाडी ता. दौंड पुणे जिल्ह्यात २२/२३ जानेवारी रोजी होणार.
परवेज मुल्ला, पुणे: एकेकाळी शेकडोवर्षे भारताच्या इतिहासात राज्य करणारे कदम घराण्याचे प्रतिवर्षा प्रमाणे क्षत्रिय मराठा कदम प्रतिष्ठानचे चौथे स्नेहसंमेलन यंदा २२ व २३ जानेवारी २०२२ रोजी गलांडवाडी ता. दौड पुणे जिल्ह्यात होणार आहे. संपुर्ण देशभरात क्षत्रिय मराठा कदम परिवारांना एकत्र आणणे, कदमांचा अपरिचित इतिहास जगासमोर आणणे, विविध क्षेत्रात यश संपादन करणा-या कदमांचा सत्कार करणे, एकमेकांना सर्व स्तरावरती मदत करणे या प्रमुख उद्देशाने प्रतिवर्षी कदमांचे स्नेहसंमेलन घेतले जात आहे. पहिले स्नेहसंमेलन श्रीक्षेत्र तुळजापूरला, दुसरे गिरवी ता. फलटणला तर तिसरे गढी ताम्हणे जि. सिंधुदुर्गला घेण्यात आले.
हे पण वाचा : भारताने कानपूरचा सामना अनिर्णित गमावला, पाकिस्तान कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये पुढे
पुढील वर्षात जानेवारीला होणारे कदमांचे चौथे स्नेहसंमेलन दत्तकला मंगल कार्यालय गलांडवाडी ता. दौंड येथे होणार असून या स्थळाची व मंगल कार्यालयाची पहाणी समस्त क्षत्रिय मराठा कदम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरराजे कदम, सचिव रामजी कदम, तुळजापूर चे माजी नगराध्यक्ष अजित दादा कदम, गिरवीचे दादासाहेब कदम, दौंडचे डाॅ. प्रविण कदम, राजेंद्र कदम, गणेश कदम, चंद्रशेखर कदम, अमोल कदम, पुण्याचे उद्योजक माऊलीशेठ कदम, अतुल मलबा कदम, दिनेश परमेश्वर कदम, गलांडवाडीचे सरपंच गजानन कदम, मंदार कदम, भाऊसाहेब कदम, नरेश कदम, योगेश कदम, स्वप्निल कदम यांनी नुकतीच करून स्नेहसंमेलनाचे स्थळ व ठिकाण निश्चित केले असून या स्नेहसंमेलनात महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम राज्यासह परदेशातून ही मोठ्या संख्येने कदम मंडळी येणार आहेत.
त्यांची सर्व व्यवस्था योग्यरित्या करता यावी यासाठीच नुकतीच गलांडवाडी येथे बैठक घेण्यात आली अशी माहिती क्षत्रिय मराठा कदम प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली.