बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा कळंब रुग्णालयात मिठाई व फळाचे वाटप..

बसवराज पाटील

बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा कळंब रुग्णालयात मिठाई व फळाचे वाटप..

परवेज मुल्ला, उस्मानाबाद: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

”उपजिल्हा रुग्णालय कळंब” येथे वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व मिठाईचे वाटप तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले, तहसीलदार बाबा दर्ग्यामध्ये फुलांची चादर चढवण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भागवत धस, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नाना करंजकर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष भैय्या निरफळ, विश्वास हौसालमल, अँड. भारत लोमटे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शहाजान शिकलगार, लतीफ भाई तांबोळी, लॅब टेक्नीशियन ईश्वर भोसले, शहर सरचिटणीस बापू मस्के, शहर संघटक राहुल साखरे, नासर शेख, कामगार सेनेचे शहराध्यक्ष शिलानंद शिंनगारे, युवक सरचिटणीस रोहित कसबे, शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.