लाॅयन्स क्लब ऑफ लातूर व समर्पण फाऊंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संप्पन.

लाॅयन्स क्लब ऑफ लातूर व समर्पण फाऊंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संप्पन.
लातूर: येथील शासकीय रक्तपेढीस रक्तपुरवठा करण्यासाठी आज लाॅयन्स क्लब ऑफ लातूर सिटी व समर्पण फाऊंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकुण 42 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला, रक्तदात्यांनां रक्तदान प्रमाणपत्र देण्यासाठी या ठिकाणी सेल्फी पाॅईंट ऊभा करण्यात आला होता.
या सेल्फी पाॅईंटवरच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीचे डॉ.दळवी साहेब, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अभ्यागत मंडळाचे सदस्य त्र्यंबक गुरुनाथ स्वामी यांच्या हस्ते रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले,शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी पण रक्तदान शिबिरास भेट दिली, शहरातील व्यापारी बांधवानी पण रक्तदानात सहभाग नोंदवला.
यावेळी लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष बस्वराज मंगरुळे, सचिव ऊमेश पोपडे, कोषाध्यक्ष संगप्पा परमा, प्रोजेक्ट चेअरमन अनिल फुलारी, माजी अध्यक्ष मनोज देशमुख, जगदिश हेड्डा, राजेशजी मित्तल, अतुलजी कोचेटा, निझाम हुच्चे, तसेच शिवसेनेचे विष्णुपंत साठे, उपस्थित होते.