राष्ट्रवादीचे नेते सर्वत्रच वादग्रस्त, खासदार अपात्र
राष्ट्रवादीचे खासदार मोहंमद फैझल यांना हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली दहा वर्षांची शिक्षा...

राष्ट्रवादीचे नेते सर्वत्रच वादग्रस्त, खासदार अपात्र
लक्षद्विप मधील राष्ट्रवादीचे खासदार श्री. मोहंमद फैझल यांना खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली नायल्याने दहा वर्षांची शिक्षा ठोठावल्याने लोकसभाच्या सचिवालयाने त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.
राज्यात नेतेमंडळींना झालेली अटक किंवा तसेच छापेमारी मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वादगस्त ठरला आहे, असे असतानाच लक्षद्विप मधील राष्ट्रवादीचे कार्यरत खासदार श्री. मोहंमद फैझल यांना हातेच्या प्रयत्नच्या आरोपाखाली दहा वर्षांची शिक्षा हि न्यायालयाने ठोठावल्याने लोकसभा सचिवालयाने त्यांना खासदार या पदावरून अपात्र ठरविले आहे. अशा नेते मंडळींच्या उद्योगांमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर मोठा परिणाम होत आहे.
मागील दोनच दिवसांअगोदर सक्त वसुली संचलनालयाने राष्ट्रवादीचे नेते हसन श्री. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केलेली होती. तसेच माजी मंत्री श्री. नवाब मलिक हे अद्याप तुरुंवासात आहेत. परुंतु दुसरे माजी मंत्री श्री. अनिल देशमुख यांना अलीकडेच जामीनही मंजूर झाला आहे. या साऱ्या होणाऱ्या घडामोडींमुळे आज राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर मोठा परिणाम होत असतानाच दिसत होता तोच लक्षद्वीप मधील पक्षाचा परत एक किसा तो म्हणजे खासदारच अपात्र ठरल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असे दिसते आहे.
हे ही वाचा >>> कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे निधन.
राष्ट्रवादीचे लोकसभेत एकूण पाच खासदार निवडून आले होते. या पैकी चार जण हे महाराष्ट्रातून तर एक जण लक्षद्वीप मधून निवडून आला होता. काँग्रेस नेते व माजी श्री. मंत्री पी. एम. सईद यांच्या नातेवाईकावर झालेल्या हल्लाप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार श्री. मोहंमद फैझल यांना दोनच दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. नवीन नियमाप्रमाणे कोणत्याही सभागृहाच्या सदस्यासा दोन वर्षे किंवा त्या पेक्षा अधिक काळाची शिक्षा ठोठावण्यात आल्यास लगेचच सदस्यत्व रद्द होते.
या नुसार लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादीच्या खासदाराला अपात्र ठरविले आहे. आता या मतदार संघात पोट निवडणूक घ्यावी लागेल. सध्या तरी राष्ट्रवादीच्या खासदारांचे लोकसभेतील संख्याबळ आज घटले आहे.