आवृत्ती , पुणे

गांजाविक्री करणाऱ्या गडचिरोलीच्या तीन उच्चशिक्षित तरूणांना पुण्यात अटक

11 लाख रूपये किंमतीचा 55 किलो गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे- चंदन नगर पोलिस स्टेशन हद्दीत, खराडी बायपास जवळ चंदननगर जवळ गांजा विक्रीसाठी तीन व्यक्ती येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात गडचिरोली जिल्ह्यातल्या राम बैस, वय वर्ष 20, रा. रामपुरी वॉर्ड कॅम्प परिसर, निकेश पितांबर अनोले, वय वर्ष … Read more

मार्केटयार्ड- गंगाधाम परिसरातील गोदामात आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ तासात आग आटोक्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड-गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिर परिसरात असलेल्या एका मंडपाच्या गोदामात रविवारी सकाळी साडे आठ वाजता आग लागली. आगीत ७ ते ८ गोदामातील साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे गोदामाशेजारी लावलेल्या २५ ट्रकला आगीची झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. … Read more

कोल्हापूर कारागृहाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारा कोल्हापूर कारागृहाचा संघ समवेत दिनेश वाघमारे, लक्ष्मीकांत खाबिया, विठ्ठलशेठ मणियार, अमिताभ गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकर आदी.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवारी येरवडा कारागृहात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवार, दि. 13 जून 2023 रोजी येरवडा कारागृहात होणार आहे. अशी माहिती अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र) आणि … Read more

कात्रज चौकात परराज्यातल्या प्रवाश्यावर कोयत्याने वार करत लुटणाऱ्या आरोपीला अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परराज्यातून कंपनी प्रशिक्षणासाठी आलेल्या व्यक्तीला पत्ता सांगण्याच्या बहाण्याने रस्त्यात अडवून त्याच्या खिशातले रोख साडेचार हजार रूपये लुटले. व्यक्तीचा मोबाईल हिसकवताना विरोध केल्याने दोन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याचे वार करत जबर जखमी केले. सदर घटनेतल्या तीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातल्या आरोपींचा शोध घेताना पोलिस अंमलदार … Read more

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना अटक, चार जण फरार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : कुर्डूवाडी रस्त्यावर हायवे स्टॉप येथे रात्री पावणेआठ वाजता बार्शी शहर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या दरम्यान एमएच 14 पासिंग असलेली एक मारूती इको ही काळ्या रंगाची त्यावर पिवळे पट्टे असलेली गाडी होती. गाडीच्या मालकाकडे चौकशी केली असताना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी गाडीची झडती घेतली. त्यामध्ये दरोडा घालण्याचे साहित्य आढळून … Read more

गांजा विक्री करणाऱ्या महिलेला मुंढवा पोलिसांकडून अटक

500 ग्रॅम गांजासह महिला ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील मुंढवा परिसरातल्या केशवनगर, गायरान वस्ती इथे अवैध गांजाविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुभद्रा माचरे, वय वर्षे 56, राहाणार गायरानवस्ती, केशवनगर मुंढवा हिला अटक केली. अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेला अंदाजे 10 हजार रूपये किंमतीचा 500 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा बिया बोंडांसह … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला!

डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई: सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला. डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय … Read more

दारूच्या दुकानावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना दोन तासात अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ परिसरातल्या एका दारूच्या दुकानात हप्त्यासाठी धमकावणाऱ्या आणि दुकानात तोडफोड करून नुकसान करणाऱ्या सहा जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन तासात अटक केली. अजय पांचाळ, तेजस वाडेकर, सोहेल आसंगी, गोविंद लोखंडे, सोन्या कांबळे व अमोल ढावरे अशी अटक केलेल्यांची नाव आहे. 24 मे रोजी फिर्यादी त्यांच्या … Read more

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ विक्रेत्या दोघा इसमांना अटक

एल.डी.एस पेपर, ओझीकुश गांजा आणि एमडीएमए गोळ्यांसह १ लाख ६६ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बालेवाडीतल्या दसरा चौकात अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या तनुज कामव्रत, वय २२ वर्षे राहणार कोथरूड व जीवन टोटन वय २० वर्षे राहणार बाणेर या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४६ हजार किंमतीचे एल.एस.डी … Read more