महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : परराज्यातून कंपनी प्रशिक्षणासाठी आलेल्या व्यक्तीला पत्ता सांगण्याच्या बहाण्याने रस्त्यात अडवून त्याच्या खिशातले रोख साडेचार हजार रूपये लुटले.
व्यक्तीचा मोबाईल हिसकवताना विरोध केल्याने दोन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याचे वार करत जबर जखमी केले. सदर घटनेतल्या तीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातल्या आरोपींचा शोध घेताना पोलिस अंमलदार अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना खबरीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोप राजु नागनाथ कांबळे ऊर्फे काळया, वय २० वर्षे, आणि अथर्व रविंद्र आडसुळ, वय २० वर्षे, दोघेही राहाणार तळजाई वसाहत, पदमावती, पुणे तसेच एका विधीसंघर्षीत बालक यांनी हा गुन्हा केल्याची खबर मिळाली होती. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक कऱण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार, दुचाकी गाडी तसेच चोरीची रक्कम जप्त केली आहे. भारती पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी वरील कारवाई, पश्चिम प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, परिमंडळ २ मा. पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
