गुन्हे शाखेच्या युनिट-५ ची कारवाई : लाखो रुपयांचा ऐवज केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतून अंड्यासहित टेम्पो चोरणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पोलिसांनी जेरबंद केले. आरोपीकडून एक घरफोडी आणि तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जावेद खान (वय ३८, रा. स.नं.४२, फैजानी मदिना मजिदसमोर, सुभानाल्ला बिल्डिंग, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेल्या टेम्पोचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपीच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी जावेद खान याला ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी त्याने वर्सोवा (मुंबई) व कोंढवा येथून दोन टेम्पो चोरल्याची आणि कोंढवा-पिसोळी येथील मोबाईल दुकान फोडल्याचे, तसेच पिकअप जीपच्या स्टेपणी चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून घरफोडी-१ व वाहनचोरीचे तीन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त श्रीमती भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाकाली गुन्हे शाखेच्या युनिट-५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, चेतन चव्हाण, आश्रूबा मोराळे, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विशाल भिलारे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, दत्ता ठोंबरे, अमर उगले, दीपक लांडगे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
