१६ व १७ डिसेंबरला झाला व्यापार मेळावा : कृष्णा डायग्नोस्टीक सेंटर व व्ही.टी.पी ग्रुपचे प्रायोजकत्व
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : विकास च्या अंर्तगत गौतम निधी मधून अनेक गरजूंना आर्थिक मदत देण्यात येते.याचेच पुढचे पाऊल टाकत गौतम निधी यांनी समाजातील उद्योजकांसाठी एक बी टू सी व्यापार मेळाव्याचे आयोजन वर्धमान सांकृतिक केंद्र बिबवेवाडी येथे १६ व १७ डिसेंबरला केले होते. या मेळाव्याला हजारो नागरीकांनी भेट देऊन हा मेळावा यशस्वी केला. या व्यापार मेळाव्यासाठी कृष्णा डायग्नोस्टीक सेंटर व व्ही.टी.पी ग्रुप यांनी प्रायोजकत्व दिले होते.
या दोन दिवसामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन गौतम निधीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी चकोर गांधी, जयश्री फडणवीस, प्रशम साबद्रा, राहुल चोरडीया, डॉ. प्रतिक पाटील, डॉ. भूषण भळगट यांचे व्यवसाय, आरोग्य तसेच विविध सामाजिक विषयावर मार्गदर्शनचे सेशन ठेवण्यात आले होते. तसेच लहान मुलांसाठी निंबध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा देखील या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. सुमारे ५० हजार हून अधिक नागरिक यांनी या दोन दिवसात या ठिकाणी भेट दिली.
या व्यापार मेळावा उदघाटन प्रसंगी उद्योगपती विशाल चोरडिया, रमणलाल लुंकड, सुभाष मुथ्था, विलास पालरेषा, पल्लवी जैन, विजयकांत कोठारी, बाळासाहेब धोका, सुनील नहार, किरण बोरा, सुनील बाफना, दिलीप चोरबेले, दिलीप मेहता यांच्या सह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल नहार, राजेंद्र मुनोत, नितीन संकलेचा, संतोष ललवाणी, नयन भंडारी, सेजल कटारीया, दिलीप कटारिया, अंकिता शिंगवी, वर्षा ओसवाल, अंजली चोरबेले, राजश्री शहा, कविता खिंवसरा, नीता पोकर्णा, नीना नहार, बबिता खाटेर, संतोष भुरट, कोमल नाबरिया, मीनल चोपडा, अनिता शहा, गौतम नाबरिया, निलेश कोठारी, गोकुळ गुगळे, राहुल ललवाणी, नमिता कटारिया, गिरीश कर्णावट, पंकज नवलाखा, सिद्धार्थ भटेवरा, पंकज पटवा, यांनी प्रयत्न केले.