महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
सोलापूर : सोलापूर येथील श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाद्वारे प्रतिवर्षी देण्यात येणारा स्व. महेंद्रभाई स्मृती गौरव पुरस्कार २०२३ पुण्याचे प्रसिद्ध समाजसेवक व व्यावसायिक राजेश शहा यांना संस्थेचे अध्यक्ष मुकेश मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवार, २४ डिसेंबर रोजी सोलापूर येथील गुजराती भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
याप्रसंगी बोलताना ‘चांगली काम करत गेल्यास लोक एकमेकांशी जुळत जाऊन समूह तयार होतो. समूहाने मिळून काम केल्यास मोठमोठी कार्ये यशस्वी होतात’ असे प्रतिपादन राजेश शहा यांनी केले. ते पुढे बोलताना म्हणाले, समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक आहे. ही वेळ समाजाला काहीतरी देण्याची आहे. गुजराती समाज एकत्र येणे आवश्यक आहे. त्यातून अनेक मोठी कार्य साकार होऊ शकतात.
या कार्यक्रमास विश्वस्थ विजय पटेल, बिपीन पटेल, केशव रामभिया आदींसह संचालक संजय शाह, भरत शाह, जगदीश पटेल, संजय पटेल, गोविंद पटेल, नीलेश पटेल, हितेंद्र वोरा, महिला मंडळाच्या अध्यक्षा पारुल पटेल, युवा फोरमचेअध्यक्ष धर्मेश राडिया, केतन शाह, तरंग शाह, ज्योती शाह, प्रीती शाह, हिना गाला, इंदिरा पटेल, उमेश ऐनापुरे, दिलीप माने, सुभाष सुराणा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपाध्यक्ष मणिकांत दंड यांनी स्वागत केले, तर सचिव जयेश पटेल यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष मुकेश मेहता यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. खजिनदार चिमण पटेल, सहसचिव संदीप जव्हेरी यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांची ओळख कौशिक शाह यांनी करून दिली. याप्रसंगी राजेश शहा यांच्या हस्ते गुजराती दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
