भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: टोळीप्रमुख पप्पु उर्फ प्रविण येणपुरे व त्याच्या ४ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली भारती विद्यापीठ पोलीसांनी ही कामगिरी केली आहे.
पप्पु उर्फ प्रविण येणपुरे (वय-२६ रा. सच्चाई माता नगर, आंबेगांव-खुर्द) हा पाहिजे आरोपी आहे तर गणेश जाधव, (वय १९ वर्ष, रा. अटल चाळ, कात्रज), अनिकेत ऊर्फ गौरव शेंडकर (वय २१ वर्ष रा. रेणुसे चाळ, कात्रज पुणे (टोळी सदस्य) यश म्हसवडे (वय २० वर्ष रा. सुंदरनगर मांगडेवाडी),अजय रेणुसे (वय २५ वर्ष रा.अटल चाळ, कात्रज)यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी हे त्यांची पत्नी व लहान भाऊ यांच्यासह कात्रज चौकाकडे कामानिमीत्त जात होते. ते जागडे यांच्या पिठाच्या गिरणीजवळ, दुगड शाळेच्या शेजारी, आंबेगाव-खुर्द याठिकाणी आले असताना, तेथे रस्त्यावर मधोमध उभे असलेल्या पप्पू येनपुरे व त्याच्या ५ ते ६ साथीदारांनी आपसांत संगणमत केले. या परिसरात त्यांची दहशत वाढविण्यासाठी फिर्यादी यांच्या दुचाकीवर लाथ मारली व त्यांच्याबरोबर वाद करण्यास सुरुवात केली. त्यांना शिवीगाळ करुन, दगडाने व लाथा-बुक्यांनी मारहाण केली. गंभीर जखमी केले. तसेच तेथील गिरणी चालकास आमच्या भांडणा बाबत पोलीसांना सांगितल्यास त्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यांची गिरणी बंद करावयास लावून दहशत पसरवली. आरोपी प्रविण येणपुरे याने त्याच्यासह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नविन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार केली आहे.त्याने गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले असुन त्यांनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतुने व इतर फायदयासाठी खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाचा प्रयत्न करणे, दंगा, दुखापत करणे, गंभिर दुखापत करणे, मारामारी, बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे, अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे जनमाणसात दहशत पसरविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहे. त्यांच्यावर कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर हे करीत आहेत. ही कामगीरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परि-२, स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक, विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर,चंद्रकांत माने, पोलीस अंमलदार, नरेंद्र महांगरे, विशाल वारुळे, स्वप्नील बांदल यांनी केली आहे. मोक्का अंतर्गत केलेली ही ११३ वी कारवाई आहे.
















