महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : शहरातील जवाहर हॉस्पिटलच्या आवारात एक कोटी रुपये खर्चुन नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. लवकरच आकर्षक अशी शिवसृष्टी बार्शीत साकारणार आहे.नगरपालिकेकडे यासंबंधीची मागणी केल्यानंतर येथील जय शिवराय प्रतिष्ठानने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला गेली चौदा वर्षे रोज पुष्पहार अर्पण करण्यासाठी जय शिवराय प्रतिष्ठान तत्पर राहिले आहे.दरम्यान, शिवसृष्टीच्या सततच्या मागणीनंतर आमदार राऊत यांनी पुढाकार घेत नगरपालिकेच्या माध्यमातून ही शिवसृष्टी साकारण्यासाठी सर्व पातळीवरील प्रक्रिया पूर्ण केली.यानंतर आता नगरपालिकेने हे काम वेगाने सुरू केले आहे. या शिवसृष्टीमध्ये मुख्य स्वरुपात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंतची माहिती देणारी १२ शिल्पे तसेच राजमाता जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराज यांची शिल्पे याचा समावेश असणार आहे. इतिहासाचा आधार घेत नव्या पिढीला आदर्श व प्रेरणादायी असलेली ही शिवसृष्टी याठिकाणी साकारण्यात येत आहे.या शिवसृष्टीसाठी कोल्हापूरचे प्रसिध्द शिल्पकार अतुल डहाके तसेच बार्शीचे प्रसिध्द चित्रकार पांडुरंग फफाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पांची जवाबदारी घेतली आहे. अनेक वर्षापासूनची ही मागणी पूर्ण होत असल्याने सर्व शिवप्रेमींना स्वप्नपूर्तीचा आनंद झाला आहे.

 
			

















