श्री विठ्ठल पतसंस्थेचा उपक्रम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी :मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बार्शी बस स्टॅण्डवर महिला.
मातांची होणारी गैरसोय ओळखून विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कै. आनंदराव पाटील व कै. आनंदीबाई पाटील यांच्या स्मरणार्थ सर्व सोयीनियुक्त असा हिरकणी कक्ष उभारण्यात आला जेष्ठ विधीतज्ञ बापू करंजकर व शारदा करंजकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी संयोजक यशवंत पाटील, राजश्री पाटील, माजी नागराध्यक्ष असिफभाई तांबोळी, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, आगार प्रमुख मधुरा जाधवर, आगार निरीक्षक नितीन गावंडे, साहय्यक पोलिस उपनिरीक्षक सिंधू देशमुख, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दुर्गा चौघुले , शारदा सानप , भगवंत पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल बनसोडे, शाखा अधिकारी प्रशांत पाटील, कालिदास पाटील, माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी गटनेते दीपक राऊत, मदन गव्हाणे, संतोष शिराळ, समीर वायकुळे, चेअरमन ऍड प्रवीण करंजकर, श्रीकांत शिंदे,सचिव वैशाली पाटील, युवराज नारकर, रुकसाना शेख, महेश शिंदे, सूरज, गरदडे, नागनाथ यमदे, प्रशांत शिंदे, संतोष कोल्हे आदी उपस्थित होते संयोजक हरिभाऊ पाटील यांनी यापूर्वी ही आई वडिलांच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या ठिकाणी दान देणगी दिलेली आहे मात्र यावर्षी गरज ओळखून सुमारे नव्वद हजार रुपये खर्च करून बसण्यासाठी सोफे, लाईट, पंखे, सह अल्यूमिनियम सेक्शनचे सुंदर असा कक्ष उभारला आहे.

 
			

















