महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : अरिहंत सोशल ग्रुप पुणेच्या वतीने अयोध्येत श्रीराम प्रभूच्या मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त संकल्पपूर्ती महाआरतीचे आयोजन केले होते. निवासी मूकबधिर विद्यालय बिबवेवाडी येथे कार्यक्रम पार पडला.
भगवान श्रीराम प्रभू हे मर्यादा, करुणा, सत्य धर्म आणि सदाचाराच्या मार्गावर कायम वाटचाल केले.
त्यांनी जगाला सत्याचा मार्ग दाखवला असे मत काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी व्यक्त केले. उद्योजक अभय संचेती म्हणाले, “मर्यादापुरुष श्रीराम प्रभूच्या मूर्तीप्रतिष्ठापना अयोध्येत लवकर होण्याचा संकल्प केला होता. तो आता पूर्ण होत आहे. या आनंदाच्या क्षणी महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात दीपमहोत्सव, रांगोळी आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच मित संचेती यांच्यासह छोट्या छोट्या बालकानी श्रीरामांचा वेशभूषा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, उद्योजक अभय संचेती, संपत बोथरा, विजय शिंगवी, मनीष संचेती, राजेश लुनिया, अनिल भंडारी, राजेंद्र धाडीवाल, सचिन गदिया, सुरेश वनगोता, रिद्धी संचेती, श्रद्धा गुंदेचा, प्रियांका दरडा लुनिया उपस्थित होते. प्रकाश दर्डा यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुंदेचा यांनी केले.















