उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पुना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तर्फे रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंटचे उद्घाटन पंचशील रियालिटीचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक अतुल चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम दिनांक 18 जानेवारी सकाळी 11.30 वाजता पुना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या ऑडिटोरियम येथे पार पडला. यावेळी अध्यक्ष देवीचंद जैन, उपाध्यक्ष दयाभाई शहा, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया, पुरुषोत्तम लोहिया, राजेश शहा, लखीचंद खिंवसरा, इंदर जैन, विलास राठोड यांच्या सह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे पुण्यातील एक मल्टीस्पेशालिटी केअर हॉस्पिटल आहे, जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक हॉस्पिटल सुविधा देऊन क्लिनिकल तज्ञ आणि नर्सिंग केअरचे उच्च दर्जाची सेवा प्रदान करते. रूग्णालय अनेक सामान्य आणि गुंतागुंतीच्या परिस्थितींसाठी जलद मूल्यांकन आणि उपचार यावर लक्ष केंद्रित करते.
















