महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
राजगुरूनगर येथील डी. बी.कर्नावट फर्म चे अध्यक्ष बन्सीलाल दयाराम कर्नावट यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. ते 84 वर्षाचे होते.
राजगुरूनगर येथील ग्रामदैवत भोपुळबुवा ट्रस्टच्या समिती मध्ये ते अजीवन खजिनदार होते. अनेक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग होता. राजगुरूनगर शहर ग्रामपंचायत सदस्य ,राजगुरूनगर सहकारी बँकेतील सुवर्णमहोत्सव काळातील ते अध्यक्ष होते. जैन समाजातील अनेक स्तुत्य उपक्रमात त्यांचा मोलाचा वाटा होता.
अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेले बन्सीलाल कर्नावट यांच्या अंत्यसंस्कारात शहरातील सर्व व्यापारी बांधव व राजकीय क्षेत्रातील लोकांचा समवेश होता.
यावेळी त्यांच्या अस्थी विसर्जित न करता त्या अस्थींसोबत वृक्षारोपण करण्यात आले व जुन्या रूढी परंपरांना छेद देऊन एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
















