महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधील रोबोटिक सर्जरी विभागाचे उदघाटन पंचशील रियॅलिटीचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक अतुल चोरडिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पूना हॉस्पिटलचे प्रेसिडेंट देविचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया तसेच जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरुषोत्तम लोहिया उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना अतुल चोरडिया म्हणाले की पुना हॉस्पिटल हे रुग्णसेवेला प्राधान्य देण्यासाठी कटिबद्ध राहिले आहे आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि निष्णात डॉक्टर्स यांच्या सहयोगाने आपली वाटचाल करीत आहे ही निश्चितच गौरवाची बाब आहे. आज वेगाने बदलणारे तंत्रज्ञान विकसित होत असताना पूना हॉस्पिटलच्या तज्ञांनी भारतातील विविध अत्याधुनिक हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कार्यपद्धती आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करून तेथील नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत आणि यासाठी पंचशील उद्योग समूह पूना हॉस्पिटला सहकार्य करण्यासाठी तयार आहे असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या प्रसंगी स्वागत करताना पुना हॉस्पिटलच्या मॅनेगिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया यांनी अद्यावत उपचार पद्धती आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने अत्यंत गुणवत्तापूर्ण आणि काटेकोर असे उपचार रुग्णांना मिळावे असे संस्थेच्या उभारणी पासूनच असलेले ध्येय आजही जोपासत आहे व याचा लाभ सर्व स्तरातील रुग्णांना मिळत आहे असे नमूद केले.
रोबोटीक ऑर्थो विभागाचे डॉ अशोक देसाई, डॉ राजन कोठारी, डॉ जयंत शहा , डॉ सुजित कद्रेकर, डॉ साम्रा श्रेणिक, डॉ सिद्धार्थ शहा यांचा गौरव अतुल चोरडिया यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जे रबिन्द्रनाथ यांनी पूना हॉस्पिटलच्या कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पुरुषोत्तम लोहिया यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ अजित तांबोळकर यांनी केले.
या प्रसंगी विश्वस्त राजेश शहा, किरीटभाई शहा, इंदर जैन, लखीचंद खिवंसरा, मुकूंददास कासट, भभूतमल जैन, सुजय शहा, नैनेश नंदू, आदित्य लोहिया व इतर मान्यवर, डॉक्टर्स उपस्थित होते.
