महाराष्ट्र न्युज नेटवर्क: अभिजीत डुंगरवाल
निगडी: निगडी येथील प्रसिद्ध उद्योगपती अशोक तातेड परिवारातर्फे मातोश्री श्रीमती फुंदाबाई तातेड यांच्या २४व्या स्म्रुतीदिना निमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात २४५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला.
तातेड परिवार गत २२ वर्षापासुन अखंडित रक्तदान शिबीराचे आयोजन करत आहे. आता पर्यंत झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण ३८४८ बॉटल रक्त रक्तपेढीच्या माध्यमातुन रक्तदान शिबीराच्या माध्यमातुन संकलित करण्यात आले.
तातेड परिवारच्या वतीने अनेक वर्षापासुन वारकर्यांसाठी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या माध्यमातुन सातत्याने अन्नदान करण्यात येते. नित्यनियमाने दुर्गा टेकडीवर पशुपक्षांकरिता धान्य देण्यात येते. या रक्तदान शिबिरात आकुर्डी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष ललवाणी, प्रसिध्द लेखिका डॉ. श्वेता राठोड, प्रा. प्रकाश कटारिया , प्रसिद्ध उद्योजक अशोक लोढा, प्रा. शारदा चोरडीया प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी तातेड परिवीराचे रक्तदान महायज्ञाबद्दल कौतुक केले. डॉ. श्वेता राठोड यांनी आई वडीलांवर समर्पक व्याख्यान दिले. रक्तदान शिबीराचे आयोजन सुरेखा तातेड, सागर व एकता तातेड यांनी केले.यावेळी रक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तु देण्यात आली.