विविध कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणा स्तोत्र कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांची १२१ वी जयंती “समाजदिन” म्हणून मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने बार्शीत साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दुपारी ४.०० वाजता जयंतीच्या मुख्य कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. जी.डी. यादव व अध्यक्षस्थानी साहित्यिक व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत. या मंडळाच्या विविध गावी असलेल्या शाखांमध्ये सप्ताहाच्या रुपाने त्या-त्या गावी जयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, क्रिडा सामने विविध सांस्कृतिक बौध्दिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र, रोख रक्कम व महनीय व्यक्तीची चरित्र ग्रंथ देण्यात येत आहे. या सप्ताहात काही खुल्या गटांसाठी वाद विवाद, वक्तृत्व व क्रीडा स्पर्धा आयोजित करुन इतरांचाही गौरव करण्यात येत आहे. प्रत्येक गावात जनजागर फेरींचे आयोजन करुन गावाशी जोडलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. १ फेब्रुवारी रोजी कर्मवीर मामांचे जीवन व कार्य या विषयावर समाजसेवकांची व्याख्याने संस्थेच्या शाखांमध्ये आयोजित करण्यात आली आहेत. २ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी यजुर्वेंद्र अनिल महाजन (दीपस्तंभ फाऊंडेशन जळगाव) यांचे प्रेरक व्याख्यान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. ते व्याख्यान सर्व मुलामुलींसाठी व बार्शीतील नागरिकांसाठी खुले आहे. ३ फेब्रुवारी रोजी संस्थेतील गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी शिक्षक तसेच संस्थेतून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी धाराशिव (आय.ए.एस) सचिन ओंबासे, डॉ. प्र.कुलगुरु पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास देवानंद चिलवंत यांची उपस्थित राहणार आहे. याच दिवशी दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे. ४ फेब्रुवारी रोजी ” समाजदिनी सकाळी ८.०० वाजता संस्थेच्या विविध शाखांची संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जनजागराची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, त्यात झांज, नृत्य, दिंडी व समाज प्रबोधनपर चित्ररथ सहभागी होणार आहे. ही प्रेक्षणीय मिरवणूक पाहण्यासाठी बार्शी शहरातील व आसपासच्या गावातील कर्मवीर प्रेमी उपस्थित राहतील. याच वेळेस तुळजापूर ते बार्शी अशी ” कर्मवीर ज्योत” धावपटूनी आणलेली असते. कर्मवीर त्यांच्या ज्ञानाचा व अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा लाभ बार्शीकरांना होणार आहे. या कार्यक्रमात कर्मवीर मामासाहेबांनी सुरु केलेल्या प्रथेप्रमाणे वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमास कर्मवीर प्रेमींनी उस्त्फूर्त सहभागी होवून समाजप्रबोधनास हातभार लावावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, जॉईन्ट सेक्रेटरी अरुण देबडवार व खजिनदार जयकुमार शितोळे तथा चेअरमन सांस्कृतिक कार्यक्रम विभाग यांनी केले आहे.
