जीतो पुणे व जीतो युथ विंग : दहा प्रकारच्या खेळांसाठी ६० संघांचा समावेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : जीतो पुणे व जीतो युथ विंग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सर्व जैन बांधवांमध्ये स्पर्धांविषयी प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘जीतो स्पोर्ट्स कार्निव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, चेस, स्विमिंग व अॅथलेटिक्स सारख्या वैयक्तिक ते क्रिकेट फुटबॉल, व्हॉलीबॉलसारख्या सांघिक स्पर्धांचाही समावेश आहे.
या एकूण दहा प्रकारच्या स्पर्धांसाठी ५ फेब्रुवारी पर्यंत नावनोंदणी करता येणार असून जास्तीत जास्त जैन समाज बांधवांनी यासाठी नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. जीतो पुणेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, जीतो पुणे युथ मेंटॉर विजय भंडारी, जीतो पुणे स्पोर्ट्सचे डायरेक्टर इनचार्ज दिलीप जैन, समन्वयक कुणाल ओस्तवाल, सहसमन्वयक अमोल कुचेरिया, जीतो पुणे युथचे अध्यक्ष निकुंज ओसवाल, मुख्य सचिव सिद्धार्थ गुंदेचा, युथ स्पोर्ट्स समन्वयक दीपक जैन, यश ओसवाल, अदित्य लोढा, आयुष पालेशा यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित केली आहे. ‘जीतो स्पोर्ट्स कार्निव्हल २०२४’ मधील या स्पर्धा विविध टप्प्यात होणार आहेत. १७ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत बिबवेवाडी येथील फ्युचर स्पोर्ट्स अकॅडमी येथे ४०० हून अधिक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवू शकणार आहेत. २६ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा येवलेवाडी येथील ब्रिलियंट स्पोर्ट्स अकॅडमी याठिकाणी पार पडणार आहे. तर टीम स्पोर्ट्स टूर्नामेंट मध्ये टर्फ क्रिकेट, टर्फ फुटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचा सहभाग असून त्या बिबवेवाडी येथील पुष्पा स्पोर्ट्स अकॅडमी येथे १४ ते १७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये टर्फ क्रिकेटसाठी मुलांचे २० संघ व मुलींचे १२ संघ फुटबॉलसाठी १२ संघ, व्हॉलीबॉलसाठी १६ संघ असे एकूण ६० संघ सहभागी होणार आहेत. विजेत्यास आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी आकर्षक व रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.